बंडूची इजार (चित्रकथा) | 5वी, मराठी, प्रश्नोत्तरे
बंडूची इजार
इयत्ता 5वी ,
मराठी ,प्रश्नोत्तर
बंडू हा शांत स्वभावाचा ,मेहनती तरुण होता. तो शेतात कष्ट करायचा.
एका वर्षी पीकपाणी बरे आल्यावर त्याने कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी एक इजार शिवली.
बंडूने इजार घालून पाहिली. ती उंचीला लांब झाली. म्हणून तो सकाळी बायकोला म्हणाला, “माझी विजार जरा चार बोटे कमी करून देतेस का?”
बायको म्हणाली, “मला जेवण करायचं आहे आणि मुलीच्या शाळेत पण जायचे आहे. मला जमणार नाही.”
बंडूने आपली बहीण सुबा हिला इजार कमी करायला सांगितले. ती म्हणाली, “मला अभ्यास आहे व माझी कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग. “
शेवटी बंडूने आईला विचारले. ती कामे करून थकली असल्यामुळे तिनेही आता इजार कमी करायला नकार दिला.
बंडूने नाराज होऊन इजार कोपऱ्यात फेकली व तो शेतात निघून गेला.
दुपारी बंडूच्या बायकोचे लक्ष इजारीकडे गेले. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे इजार सकाळीच दुरुस्त करायला पाहिजे होती, या विचाराने तिने इजारीचे पाय चार बोटे इतके कापून कमी केले व हातशिलाई घातली.
सुबा कॉलेजमधून आली. तिलाही आपली चूक लक्षात आली. तिनेही इजारीचे पाय कापले व टाके घातले.
संध्याकाळी आई आली तिनेही इजार चार बोटे कापली व टाके घातले. थकलेला बंडू परत आला. त्यानेही इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपले काम आपणच केलेले बरे ! असा विचार करून इजार कमी केली. बंडूने जेव्हा इजार घातली, तेव्हा त्या इजारीची चड्डी झाली होती. चड्डीतल्या बंडूला पाहून सारे खळखळून हसू लागले.

1-इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची?
इजारीची चड्डी झाली, यात चूक सगळ्यांचीच झाली. परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते.
2-बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे ‘पाय’ असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. विजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची
नावे वापरतात. त्यांची नावे सांगा.
1) शर्टाचे हात, 2) पेनची जीभ, 3) कपाचा कान, 4) बटाट्याचा डोळा, 5) बाटलीचे तोंड, 6) टेबलाची पाठ.
3-बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.
बंडूची इजार आखूड झाली असती, तर
1) तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता.
2) इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती.
परिपाठ
अनु. | उपक्रम | लिंक |
1 | राष्ट्रगीत | क्लिक करा |
2 | प्रतिज्ञा | क्लिक करा |
3 | प्रार्थना | क्लिक करा |
4 | बोधकथा | क्लिक करा |
5 | पसायदान | क्लिक करा |
6 | वंदे मातरम् | क्लिक करा |
7 | संविधान | क्लिक करा |
अधिक माहिती मिळवण्यासाठी ….
जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा