एक हात मदतीचा

exam paper

एक हात मदतीचा

आमच्या डीएड कॉलेजचे वर्गमित्र उपक्रमशील सहशिक्षक श्री सचिन शेळके यांचा  मुलगा सार्थक यास फॅन्कोनी ॲनिमिया हा दुर्मिळ आजार वयाच्या आठव्या वर्षापासून आहे. त्यावर ते गेली चार वर्षे उपचार करत आहेत. यावर कायमस्वरूपी इलाज म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी करणे आवश्यक आहे.

त्यासाठी 100% मॅच होणारा बोन मॅरो डोनर मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत सचिन यांनी स्वतःचा बोन मॅरो जो की 50% मॅच होणार आहे, तो देण्याचे ठरवले आहे.

सदर शस्त्रक्रियेसाठी आपणास अवगत असेल की 25 लक्ष रुपये खर्च येणार आहे. आजवर मुलाला दर आठवड्याला रक्त भरावे लागत आहे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम जमवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे त्यांनी मदतीचा हात मागितला आहे.

तरी अशा कठीण प्रसंगी आपला एक सहकारी म्हणून सहकाऱ्यांकडून यथाशक्ती मदतीची अपेक्षा आहे.

आपला मित्र –श्री.विजय जाधव

(तालुकाध्यक्ष, शिक्षक समिती,जामखेड)

अधिक माहितीसाठी लिंक – CLICK HERE /

PDF माहिती डाऊनलोड करा.

आपण पाठवलेली मदत 80G अंतर्गत करपात्र आहे, आपल्याला पावती मिळेल.

Leave a Reply