मुंग्यांच्या जगात | 5वी, मराठी प्रश्नोत्तर
मुंग्यांच्या जगात
– प्रकाश किसन नवाळे
पाठ परिचय-MUNGYACHYA JAGAT
मुंग्या अनेक प्रकारच्या असतात. त्या वसाहत करून एकत्र राहतात. मुंग्या परिस्थितीनुसार विशिष्ट गंधकण सोडतात. या गंधकणांच्या साहाय्याने त्या इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात व आपले संरक्षण, शत्रूवर हल्ला, अन्नसाठा इत्यादी कार्ये करतात. त्या उदयोगी आहेत. त्या सामाजिक जीवन जगतात. मुंग्यांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मुंग्यांची माहिती मुंग्यांच्या जगात या पाठात दिली आहे.

एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?
उत्तर : मुंगी हा कीटकांमध्ये सर्वांत जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून किटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.
2) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?
उत्तर : अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात.
3) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?
उत्तर : स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.
4) मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?
उत्तर : कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात.
5) संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात?
उत्तर : संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात.
6) एखादया मुंगीला चिरडले; तर काय होते?
उत्तर : एखादया मुंगीला चिरडले; तर अधिक प्रमाणात गंधकण सोडले जातात.
मुक्तोत्तरी प्रश्न-
पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण किंवा वैशिष्ट्ये तुम्हांला आवडली ते सांगा.
उत्तर : मुंग्यांचे गुण :- उदयोगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार.
मुंग्यांची वैशिष्ट्ये :-
1) त्यांच्या अंगांत रासायनिक गंधकण असतात.
2) त्यायोगे मुंग्या एकमेकींशी संवाद साधतात.
3) स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यास मुंग्या तत्पर असतात.
4) स्वत:च्या संरक्षणासाठी मुंग्या विषारी दंश करतात व आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात.
5) काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते.
6) मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे.
वाक्यांत उपयोग करा.
1) माग काढणे.
चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले.
2) सावध करणे.
कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले.
3) फवारा सोडणे.
लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला.
4) तत्पर असणे.
दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे.
5) पळ काढणे.
पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.
पुढील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा.
1) बंडूची इजार चार बोटे लांब झाली.
– बंडू, इजार, बोटे
2) आईने इजार एका कोनाड्यात फेकली.
– आई, इजार, कोनाडा
3) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.
– माणूस, मुंग्या
4) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे.
– कविता, भारत, धावपटू
वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य नामे घाला.
1)-–- माधवला म्हणाली.
– आई
2) आंब्याच्या झाडावर —-लटकत होत्या.
– कैऱ्या
3) घसरगुंडी खेळायला —-आम्ही गेलो.
– बागेत
4) –—विषय मला खूप आवडतो.
– मराठी
5) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून—— मंत्रमुग्ध झाला.
– समिर
6) महागाई वाढल्याने—–महागल्या.
– वस्तू
अधिक माहिती मिळवण्यासाठी ….
जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा