सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत | 5वी, मराठी

सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत

पाठ परिचय

सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली, याची रोचक माहिती या पाठात दिली आहे.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला ?
उत्तर : कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धांत भारताचा दबदबा निर्माण केला.
2) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले ?
उत्तर : कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले.
3) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले?
उत्तर : जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले.
4) कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही?
उत्तर : आईला उगीच वाईट वाटेल, म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही.
5) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते?
उत्तर : कविता पी. टी. उषा या धावपटूला आदर्श मानते.
6) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते?
उत्तर : कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते.

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

1) कविता राऊतला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ का म्हणतात?
उत्तर कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धांतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणतात.
2) कविताला कशामुळे दिलासा मिळाला?
उत्तर : चीनमधील गुआंगजऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्या वेळी दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला.
3) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली?
उत्तर : आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हरसूल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यांसाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली.
घरी राहू लागली.
4) हरसूल-सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो?
उत्तर : कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हरसूल-सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हरसूल-सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हरसूल- सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो.
5) आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईना का वाटते?
उत्तर : नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारोजण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे, असे सुमित्राबाईंना वाटते.
 6) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात?
उत्तर : नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायांमधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांनाच देतात.

समान अर्थाचे शब्द लिहा. 

1) माय -आई ,,2) गहिरे-खोल
3) लेक-मुलगी, 4) क्रीडा -खेळ
5) बळ-शक्ती, 6) वडील-बाप

पुढीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. 

1) पण – वेगळेपण, लहानपण
2) दार- चमकदार, बहारदार
3) पणा कमीपणा, शहाणपणा
4) पणी – लहानपणी, जागेपणी
5) इक- आर्थिक, व्यावहारिक
6) इत -अखंडित, सदोदित

पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.

1) दिलासा मिळणे- खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते; पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला.
2) गराडा पडणे-पुढारी गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला.
3) कणखर बनणे- दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले.
4) ओढाताण होणे – शेतातले काम व शाळा यांमध्ये कुमारची फार ओढाताण होते.
5) नात्यातली वीण गहिरी असणे – मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे.
6) वणवण सहन करणे- महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते.

पर्यायी उत्तर ओळखा.

बरोबर जोडीचा क्रमांक ओळखा

1) कमीपणा वाटणे- आनंद वाटणे.
2) खंत वाटणे- खेद वाटणे.
3) कसूर करणे योग्य करणे.
4) खंड पडणे – चिंता करणे.

चुकीच्या जोडीचा क्रमांक ओळखा. 

1) राबणे- खूप कष्ट करणे.
2) दबदबा निर्माण करणे- दरारा निर्माण करणे.
3) सांभाळ करणे- पालन करणे.
4) नाव उंच करणे- मातीमोल ठरणे.

माहिती मिळवण्यासाठी ….

जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

Education Department

You may also like...

Leave a Reply

%d bloggers like this: